Posts

Showing posts from March, 2023

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

Image
काही पुस्तकं ही एखाद्या विषयाची सुरुवात म्हणून वाचायची असतात आणि तिथून पूढे तो विषय बाकीच्या पुस्तकातून समजून घ्यायचा असतो. Minimalism: Live a Meaningful Life हे अशाच प्रकारचे पुस्तक आहे. खरं तर तुकोबा चारशे वर्षांपूर्वीच सांगून गेलेत, "चित्ती असो द्यावे समाधान" म्हणजे आपल्याला जितकं मिळवता येईल, घेता येईल त्याच्या मागे न लागता समाधानी वृत्ती ठेवा.. भौतिक गोष्टीत कमी असल्या तरी समाधान मानता आलं पाहिजे. पण सध्या "रॅट रेस" आणि "ऐपतीच्या बाहेरच्या वस्तू घेण्याच्या" सवयीमुळे आपण वस्तूंमध्ये गुंतत चाललो आहोत. आणि गेल्या काही वर्षातल्या " जे जे पाश्चात्य ते ते अनुकरणीय " ह्या संकल्पनेप्रमाणे सगळेच " भौतिक सुखाचा ओला दुष्काळ" (माझी व्याख्या - आवडेल ते, वाटेल ते, दिसेल ते, शेजाऱ्यांकडे/मित्रांकडे/सहकाऱ् याकडे असेल ते आणि रीलवर दाखवतील ते सगळं घेऊन घर भरून जगणं म्हणजे "भौतिक सुखाचा ओला दुष्काळ") अनुभवत आहोत. पण जिथे हे उपजलं त्याच अमेरिकेतले लोक आता ह्या रॅट रेस ला आणि अनावश्यक वस्तू जमवण्याच्या वेड्या हट्टाला धोकादायक समजू लागले आहेत