पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

काही पुस्तकं ही एखाद्या विषयाची सुरुवात म्हणून वाचायची असतात आणि तिथून पूढे तो विषय बाकीच्या पुस्तकातून समजून घ्यायचा असतो. Minimalism: Live a Meaningful Life हे अशाच प्रकारचे पुस्तक आहे.


खरं तर तुकोबा चारशे वर्षांपूर्वीच सांगून गेलेत, "चित्ती असो द्यावे समाधान" म्हणजे आपल्याला जितकं मिळवता येईल, घेता येईल त्याच्या मागे न लागता समाधानी वृत्ती ठेवा.. भौतिक गोष्टीत कमी असल्या तरी समाधान मानता आलं पाहिजे. पण सध्या "रॅट रेस" आणि "ऐपतीच्या बाहेरच्या वस्तू घेण्याच्या" सवयीमुळे आपण वस्तूंमध्ये गुंतत चाललो आहोत.


आणि गेल्या काही वर्षातल्या "जे जे पाश्चात्य ते ते अनुकरणीय" ह्या संकल्पनेप्रमाणे सगळेच "भौतिक सुखाचा ओला दुष्काळ" (माझी व्याख्या - आवडेल ते, वाटेल ते, दिसेल ते, शेजाऱ्यांकडे/मित्रांकडे/सहकाऱ्याकडे असेल ते आणि रीलवर दाखवतील ते सगळं घेऊन घर भरून जगणं म्हणजे "भौतिक सुखाचा ओला दुष्काळ") अनुभवत आहोत. पण जिथे हे उपजलं त्याच अमेरिकेतले लोक आता ह्या रॅट रेस ला आणि अनावश्यक वस्तू जमवण्याच्या वेड्या हट्टाला धोकादायक समजू लागले आहेत. त्यातूनच सुरु झालेली एक चळवळ म्हणजे "मिनिमलिजम"! जी सांगते की तुम्हाला जगण्यासाठी सगळ्या महागड्या, ईर्षेपोटी आणि कर्ज काढून घेतलेल्या वस्तूंची गरज नाहीये, तुम्ही अगदी कमीत कमी वस्तूंमध्ये सुद्धा चांगलं जीवन जगू शकता. आता सांगा, आहे की नाही दुनिया गोल - आमच्या आज्या-पंज्यानी (गरीबीमुळे) हेच तर केलं आणि आमच्या संत महात्म्यांनी सुद्धा हेच सांगितलं - "मिनिमलिजम"! पण ते साहेबाच्या भाषेत नव्हतं आणि  लेखक म्हणून साहेबांची नावंसुद्धा नव्हती, मग काय, आम्ही दुर्लक्ष केलं की हो!

उद्या कदाचित एखादा मिलेनिअल (तिशीत असणारे) किंवा जेन झी (विशीच्या आतले युवक-युवती) फर्ड्या इंग्रजीमध्ये हे "मिनिमलिजम" कसं "cool" आणि "great" आहे हे सांगतील! कारण ते अमेरिकेतनं आलं आहे आणि त्यांना त्याचं फार अप्रूप वाटणार आहे! असो, मुद्दा थोडा भरकटला आहे..  पण आता एवढं वाचल्यावर तुम्हाला पुस्तक कशावर आहे ह्याची कल्पना आलीच असेल! आजच्या आपल्या Westernized झालेल्या आयुष्याविषयी आणि त्याच्या विरुद्ध जगण्याविषयी हे पुस्तक माहिती देतं, दोन लेखकांच्या प्रवासाच्या वर्णनाने.. वाचायला हरकत नाही! पुस्तकातले काही महत्वाचे मुद्दे खाली देतो आहे, त्यावरून सुद्धा पुस्तकातल्या आशयाची कल्पना येऊ शकेल..

Lesson 1: Paying off all your debt will give you tremendous freedom and relief.

Lesson 2: You can use the TARA method to accept others as they are, even if they disagree with minimalism:

Tolerate their quirks.
Accept they will always exist.
Respect the time they dedicate to them.
Appreciate that aspect of their lives, as it’s a little part of your life too.

Lesson 3: Social interactions are centred around our work, but you’re much more than your job. Make sure it shows.

तुम्हाला "मिनिमलिजम" ह्या सध्याच्या ट्रेंडिंग संकल्पनेविषयी जास्त काही माहिती नसेल तर हे पुस्तक एक चांगली सुरुवात ठरू शकते!

Comments

  1. Sir can you share your mail id ..how to reach you..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वैचारिक साहित्य - वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडविण्याची ताकद असलेले साहित्य.

ह्या आठवड्यात मी काय वाचू?