Posts

Showing posts from August, 2022

पुस्तक परिचय - सावित्रीबाई फुले

Image
सावित्रीबाई फुले - जी. ए. उगले सनावळ्या, जयंत्या-पुण्यतिथ्या, हारतुरे, तसबिरी म्हणजे इतिहास नाही - ते झालं इतिहास “मिरवणं”! आपण फक्त हेच जर करत बसलो तर मग या सर्वांच्या मागे काय दडलंय ते कधी समजावून घेणार? इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने वाचन/आकलन करणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले हे पुस्तक तसेच अभ्यासपूर्ण आहे. “ज्योतीबांच्या सावली सावित्रीबाई” ह्यापलीकडे एक स्वतंत्र समाजसुधारक, स्त्री उद्धारक, शिक्षण प्रसारक, कवयत्री आणि दीनदुबळ्यांची आई म्हणून सावित्रीबाई कशा होत्या? हे ९ भागांमध्ये ह्या पुस्तकात मांडले आहे.. सुरवात होते तीच त्यांच्या शैक्षणिक कार्यातील अमूल्य योगदानाने.. - भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी केलेले काम - इतर स्त्री शिक्षिकांना दिलेले प्रोत्साहन - सहन केलेल्या हाल-अपेष्टा - ज्योतिबांसोबत नगरच्या शाळांना दिलेल्या भेटी - आरंभलेली शैक्षणिक क्रांती लेखकाने अशा विषयांवर माहितीपूर्ण भाष्य केले आहे. सावित्रीबाईंचे - सामाजिक कार्य - दुष्काळग्रस्तांना केली मदत - पुण्यात प्लेगच्या साथीच्या वेळेस रुग्णांची केलेली सेवा - बालहत्या प्रतिबंधकग्र

TED Talk मराठी सारांश - Success, Failure and The Drive To Keep Creating

Image
यश, अपयश आणि नवनिर्मितीची प्रेरणा  (Success, Failure and The Drive To Keep Creating) -  एलिझाबेथ गिल्बर्ट प्रतिथयश लेखक त्याच्या सर्वोत्तम लिखाणानंतर काही लिहिताना त्याचं यश, अहंभाव, भीती कशी हाताळतो? आणि त्यातून आपण काही शिकू शकतो का? ह्या विषयावर 'ईट, प्रे, लव्ह' ह्या पुस्तकाची लेखिका एलिझाबेथ गिल्बर्टने "यश, अपयश आणि नवनिर्मितीची प्रेरणा" हे TED Talk दिले आहे.  एलिजाबेथचे 'ईट प्रे लव्ह' हे पुस्तक न्यूयॉर्क टाईम्सच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे, त्याच नावाने सिनेमा पण आलेला आहे. पण एवढ्या प्रसिद्धी नंतर आणि लोकांना आवडलेल्या पुस्तकानंतर आपण दुसरे कोणतेही पुस्तक लिहिले तर ते लोकांना आवडणार नाही, कारण ते तिच्या पहिल्या पुस्तकांसारखे नसणार! तर मग आता वाचकांची मने जिंकणे जवळपास अशक्य आहे असे समजून गावाकडे पाळीव प्राण्यांसोबत उर्वरित आयुष्य घालवावे असा तिने विचार केला. पण जर सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे लिहिणं सोडून दिलं तर आपण आपलं स्वत्व, किंवा आयुष्यातला राम सोडून दिला असेच होईल हे तिला मनोमन जाणवले. मग आता लोकांना आवडेल की नाही, हा विचार बाजूला ठेवून