TED Talk मराठी सारांश - Success, Failure and The Drive To Keep Creating

यश, अपयश आणि नवनिर्मितीची प्रेरणा (Success, Failure and The Drive To Keep Creating) - एलिझाबेथ गिल्बर्ट

प्रतिथयश लेखक त्याच्या सर्वोत्तम लिखाणानंतर काही लिहिताना त्याचं यश, अहंभाव, भीती कशी हाताळतो?
आणि त्यातून आपण काही शिकू शकतो का? ह्या विषयावर 'ईट, प्रे, लव्ह' ह्या पुस्तकाची लेखिका एलिझाबेथ गिल्बर्टने "यश, अपयश आणि नवनिर्मितीची प्रेरणा" हे TED Talk दिले आहे. 

एलिजाबेथचे 'ईट प्रे लव्ह' हे पुस्तक न्यूयॉर्क टाईम्सच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे, त्याच नावाने सिनेमा पण आलेला आहे. पण एवढ्या प्रसिद्धी नंतर आणि लोकांना आवडलेल्या पुस्तकानंतर आपण दुसरे कोणतेही पुस्तक लिहिले तर ते लोकांना आवडणार नाही, कारण ते तिच्या पहिल्या पुस्तकांसारखे नसणार!

तर मग आता वाचकांची मने जिंकणे जवळपास अशक्य आहे असे समजून गावाकडे पाळीव प्राण्यांसोबत उर्वरित आयुष्य घालवावे असा तिने विचार केला. पण जर सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे लिहिणं सोडून दिलं तर आपण आपलं स्वत्व, किंवा आयुष्यातला राम सोडून दिला असेच होईल हे तिला मनोमन जाणवले.

मग आता लोकांना आवडेल की नाही, हा विचार बाजूला ठेवून पुन्हा एकदा तिचा आत्मविश्वास आणि प्रेरणा परत मिळवायची असं एलिजाबेथने ठरवले. आपली लिहिण्याची प्रेरणा आणि त्याच यश हे त्याच्या व्यक्त होण्यातच आहे हे ठरवून पुढचा प्रवास सुरु झाला. प्रेरणा मिळाली ती पण एकदम अनपेक्षित ठिकाणी!

सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) स्वतःच्या अपयशातून कशी टिकून राहू शकते याबद्दल तिने जीवनात पूर्वी शिकलेल्या धड्यांमध्ये तिला ती प्रेरणा मिळाली! तिचं एकच ध्येय होतं ते म्हणजे 'लेखक व्हायचं' आणि त्यासाठी ती बालपणापासून काही ना काही लिहीत होती, अगदी किशोरवयीन असताना तिने स्वतःच सामान्य लिखाण पण न लाजता, न घाबरता न्यूयॉर्क टाईम्सला पाठवायला सुरुवात केली होती.

कॉलेज संपल्यावर, वेटर म्हणून काम करत असताना पण ती लिहीत राहिली, काहीतरी छापून यावं म्हणून खूप प्रयत्न करत राहिली आणि त्यात सलग सहा वर्षे अपयश आले - कोणीच तिचे लिखाण छापले नाही. त्यामुळे जवळजवळ सहा वर्षे, प्रत्येक दिवशी, तिच्याकडे फक्त नकार देणारी पत्रच येत होती.. आणि ते प्रत्येक वेळी मिळणार अपयश उध्वस्त करणारं असे.. आणि प्रत्येक वेळी, तिला स्वतःला सांगाव वाटायचं "दे हे सगळं सोडून, तू जगाच्या खूप मागे पडली आहेस आणि तुझं पुस्तक कधीच छापलं जाणार नाही".

पण मग तिने स्वतःला सांगायला सुरुवात केली की, "मला माझं ध्येय नक्की गाठता येईल. मी माझं लिहिणं सोडणार नाही, मी माझ्या इच्छित ठिकाणी, माझ्या घरी नक्की पोहचेन!" आणि तिच्यासाठी, घरी जाण्याचा अर्थ कुटुंबाच्या शेतात परतणे असा नाही. तर, 'लेखनाच्या कामाकडे परत जाणे'.. म्हणजे लिखान हेच तिचे घर होते, कारण तिला लिहिण्यात यशस्वी होणं हे जास्त जवळच होतं. त्यात हार मानणं तिला आवडलच नसतं! म्हणजे "माझ्या स्वत: च्या अहंकारापेक्षा लेखन आवडते" असे तिला म्हणायचे आहे.. 

मला माझ्या स्वतःवर जितके प्रेम होते त्यापेक्षा अधिक माझ्या ध्येयावर - लिखाणावर माझं जास्त प्रेम होतं!" असा तिचा ठाम विश्वास होता.

..आणि मग तिने पुन्हा लिखाणाला सुरुवात केली.. पण ह्या सगळ्यात तिला पडलेला प्रश्न म्हणजे त्या वेटर असलेल्या, अयशस्वी अशा तरुण स्वतःची आठवण तिला आणि त्यातून का बरं प्रेरणा मिळावी? कारण आता मिळालेलं यश हे त्या अपयशापेक्षा आभाळ भरून मोठं होत! आणि मग तिला का यावी? एक मानसशास्त्रीय सत्य उलगडायला लागलं - तुम्ही तुमच्या जीवनाचा बऱ्यापैकी मोठा भाग हा अशा काळात घालवता जिथे साधं सरळ आणि सुरक्षितपणे चालू असतं पण जर का अपयश आलं कि तुम्ही एका अंधाऱ्या पोकळीत फेकले जाता जिथे खूप निराशा असते. याउलट, यश तुम्हाला तितक्याच आकस्मिकपणे पण खूप दूर "प्रसिद्धी आणि स्तुतीच्या" तितक्याच अंधुक झगमगाटात घेऊन जाते.

आता ह्या अयशस्वी आणि यशस्वी अशा दोन्ही प्रकारच्या जगण्यात एक साम्य आहे - तुमचं तुमच्या ध्येयापासून दूर जाणं, तुमचं स्वत्व हरवणं. तर मग ह्यापासून पुन्हा तुमच्या मूळ स्वभावाकडे, ध्येयाकडे येणं म्हणजे तुमच्या घरी परत येणं. तुमचं घर म्हणजे तुमचं उद्दिष्ट/ध्येय जे तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त आवडतं! मग ते तुमचं लेखक होणं, चांगला इंजिनीअर होणं, कलाकार किंवा सृजनशील व्यक्ती असणं, तुमचं रुग्णांच सेवा करणं, गाणं गाणं, एक उत्तम प्रशासकीय अधिकारी असणं किंवा समाजसेवा करणं ह्या पैकी काहीही असू शकतं!

एलिझाबेथ साठी ते तिचं "लिखाण आणि लेखक" होणं आहे! ती निराशाजनक किंवा एक अयशस्वी लेखक म्हणून जगात असताना सुद्धा तिला तिचं लिखाण सोडून द्यायचं नव्हतं, कारण तेच तर तिच्यासाठी तिचं जगण्याचं ध्येय होतं! 

एलिझाबेथ म्हणते, "ती आता एक पुस्तक लिहिते आहे आणि त्यानंतर दुसरे पुस्तक लिहीन आणि तिसरे आणि त्यापैकी बरेच अयशस्वी होतील आणि काही यशस्वी होतील, परंतु मी ह्या वादळांपासून नेहमीच सुरक्षित राहीन. जोपर्यंत 'लिहिणं हे माझं ध्येय आहे' हे विसरत नाही तोवर परिणामाची पर्वा न करता मी लिहीत राहीन आणि माझ्या ध्येयावर प्रेम करत राहीन."

एलिजाबेथच्या बोलण्यातून मला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला -  एक म्हणजे की मेधा पाटकर किंवा तुकाराम मुंढे सारखे अधिकारी हे हार न मानता एवढ्या कठीण, अपयशी परिस्थितीमध्ये सुद्धा कसे लढत राहू शकतात आणि आपण पण आपलं ध्येय शोधून तसं एकनिष्ठ कसं राहू शकतो. हे सात मिनिटांचं Ted Talk नक्की ऐका मित्रानो.





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

वैचारिक साहित्य - वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडविण्याची ताकद असलेले साहित्य.

ह्या आठवड्यात मी काय वाचू?