Posts

Showing posts from November, 2022

आई-बाबांसाठी दोन पावलं जास्ती चालू या!

Image
  सध्या   साठी - सत्तरीत   असणाऱ्या   पा लकांनी   मागच्या   २०   वर्षात   एवढे   प्रचंड   बदल   बघितले   आहेत   की   जे   त्यां च्या   आधीच्या   पिढीला क्वचितच   बघा यला   मिळाले   असतील ..  आणि   ते   ह्या   बदलांना   स्वीकारून   खूप   छान   पद् धतीने   जगात   आहेत ,  कौतुक   आहे   त्यांचं  खूप ! म्हणून   जर   कधी   असं   वाटत   असेल   ना   की   ते   आपल्याला   समजून   घेत   नाहयेत   किंवा   चिडचिड   होत   असेल   तर   फक्त   एका   गोष्टीचा   विचार  करायचा   की   आपल्याला   सुद्धा   समजत   असून ,  मा हिती   असून   सुद्धा   काही   डिजिटल   गो ष्टी  accept  करायला   आणि   शिकायला सुरुवातीला   अवघड   गेलंच   होतं   की . .  तर   मग   त्यांना   ह्या   गोष्टी   कि ती   अवघड   गेल्या   असतील ?  अजूनही   जा त   असतील .. आणि   फक्त   तंत्रज्ञानच   नाही   तर   त्या सोबत   समाजात ,  कामाच्या   ठिकाणी ,  दैनंदिन   जगण्यात ,  खाण्यापिण्यात   अशा   सगळ्याच   बाबतीत  गेल्या   ५   वर्षा त   झालेले   बदल   व्हायला   त्यांच्या   आधीच्या   पिढीला   १५ - २०   वर्ष   ला गली   असती   पण   ह्यांना   तसा   पर

वैचारिक साहित्य - वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडविण्याची ताकद असलेले साहित्य.

Image
माझ्या मते वैचारिक साहित्य म्हणजे लेखकाने सत्याचा आधार घेऊन स्वतःचे विचार परखडपणे लिहिलेले साहित्य . हे साहित्य वाचकाच्या विचारांना चालना देण्याचे आणि मतपरिवर्तन करण्याला कारणीभूत ठरते . वाचकाला तात्विक , तर्कसुसंगत आणि ज्ञानाधिष्ठित विचारांचे खाद्य देऊन वैचारिक प्रगतीच्या वाटेवर दोन पाऊले पुढे घेऊन जाण्याचे   काम ह्या साहित्याने गेली अनेक शतके केले आहे . वैचारिक साहित्याकडे आकृष्ट होऊन त्याचा अभ्यास करण्याचा विचार करणारी वाचकमंडळी म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या वाटेवरचे वारकरीच आहेत जणू !     वैचारिक साहित्याचे वेगळेपण - ललित साहित्यात लेखक भाव , कल्पना , कुतूहल , भीती अशा भावनांना चालना देत असतो तर वैचारिक साहित्यात फक्त विचारांना   वैचारिक आणि मत परिवर्तनाला महत्व असते . मेंदूला झिणझिण्या आणणारे शब्द आणि त्यांचे अर्थ येथे उतरविलेले असतात ! वैचारिक साहित्य लेखकापेक्षा वाचकाचीच जास्त कसोटी घेत असते ! वैचारिक साहित्य वाचताना लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मतांना / मान्यतांना आ

माझा वाचनप्रवास...

Image
  शाळेत असताना चंपक , चांदोबा अशी गोष्टींची पुस्तकं वाचली . घरी काही साप्ताहिकं आणि मासिकं येत असत , त्यातले काही छान चित्र असलेले लेख पण वाचायचो .. थोडा मोठा झाल्यावर फास्टर फेणे , श्यामची आई , वैज्ञानिकांची आणि क्रांतिकारकांची माहिती , कोडी सोडवणे , प्रश्नमंजुषा असं पण वाचायला लागलो . इतिहासाच्या शिक्षकांनी ऐतिहासिक पुस्तक वाचण्याचं वेड लावलं , ते आताही टिकवून ठेवायचा प्रयत्न आहे . घरात वाचणारी वडीलधारी मंडळी असल्यामुळे बऱ्याचदा त्यांनी आणलेली पुस्तके पण चाळत असे , काही कळलं तर ठीक नाहीतर मग त्यांना प्रश्न विचारून समजावून घेत असे .. आणि कधी कधी स्वतःच ठरवत असे की हे जड पुस्तक आहे , मोठा झालो की वाचेन ! शाळेच्याच वयात संतसाहित्याची , इतिहासाची आणि रहस्यकथा वाचायची आवड पण निर्माण झाली .. ती आजतागायत जोपासली आहे ! कॉलेजात असताना वाचन वाढलं आणि मग सेल्फ - हेल्प , जगातल्या मोठ्या मोठ्या लोकांची चरित्रे , मराठी नावाजलेल्या कादंबऱ्या वाचायला लागलो .. “ आपल्याला जग बदलता येईल का ? किं