माझा वाचनप्रवास...

 


शाळेत असताना चंपक, चांदोबा अशी गोष्टींची पुस्तकं वाचली. घरी काही साप्ताहिकं आणि मासिकं येत असत, त्यातले काही छान चित्र असलेले लेख पण वाचायचो.. थोडा मोठा झाल्यावर फास्टर फेणे, श्यामची आई, वैज्ञानिकांची आणि क्रांतिकारकांची माहिती, कोडी सोडवणे, प्रश्नमंजुषा असं पण वाचायला लागलो. इतिहासाच्या शिक्षकांनी ऐतिहासिक पुस्तक वाचण्याचं वेड लावलं, ते आताही टिकवून ठेवायचा प्रयत्न आहे. घरात वाचणारी वडीलधारी मंडळी असल्यामुळे बऱ्याचदा त्यांनी आणलेली पुस्तके पण चाळत असे, काही कळलं तर ठीक नाहीतर मग त्यांना प्रश्न विचारून समजावून घेत असे.. आणि कधी कधी स्वतःच ठरवत असे की हे जड पुस्तक आहे, मोठा झालो की वाचेन!


शाळेच्याच वयात संतसाहित्याची, इतिहासाची आणि रहस्यकथा वाचायची आवड पण निर्माण झाली.. ती आजतागायत जोपासली आहे!




कॉलेजात असताना वाचन वाढलं आणि मग सेल्फ-हेल्प, जगातल्या मोठ्या मोठ्या लोकांची चरित्रे, मराठी नावाजलेल्या कादंबऱ्या वाचायला लागलो.. आपल्याला जग बदलता येईल का? किंवा मी काय करू शकतो?” असे विचार ह्या वयात असतात त्यामुळे अशी पुस्तके आवडतात आणि पटकन वाचून होतात.


पुढे मग बिजनेस किंवा जॉबशी रिलेटेड समकालीन लोकल आणि ग्लोबल पुस्तके वाचली (इंग्रजी आणि अनुवादित) आणि सोबतीला जमेल तसं कथा-कादंबऱ्या पण वाचत होतो.. तुम्ही कामाचं/प्रगतीसाठी आवश्यक वाचायला लागलात की वाचनाची आवड टिकवून ठेवता येतें असे वाटते.


आणि आता घरात छोटं मूल आहे आणि बाकीच्या जबाबदाऱ्या पण वाढल्यात म्हणून फार निवडक, आवडणारं आणि जगण्याकडे बघण्याची दृष्टी सुधारता येईल, बदलता येईल असं शोधून शोधून वाचतो आहे (मराठी, हिंदी आणि इंग्रजी)!


येणाऱ्या पुढील काही वर्षात संतसाहित्य, मराठी खंड पुस्तकं, इंग्रजी साहित्य आणि समकालीन साहित्य वाचेन असे ठरवले आहे!


निवृत्तीनंतर काय वाचावं हे त्याआधी काय, कसं आणि किती वाचून होतं यावर ठरवणार आहे!


धन्यवाद!




Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

वैचारिक साहित्य - वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडविण्याची ताकद असलेले साहित्य.

ह्या आठवड्यात मी काय वाचू?