आई-बाबांसाठी दोन पावलं जास्ती चालू या!

 


सध्या साठी-सत्तरीत असणाऱ्या पालकांनी मागच्या २० वर्षात एवढे प्रचंड बदल बघितले आहेत की जे त्यांच्या आधीच्या पिढीलाक्वचितच बघायला मिळाले असतील.. आणि ते ह्या बदलांना स्वीकारून खूप छान पद्धतीने जगात आहेतकौतुक आहे त्यांचं खूप!


म्हणून जर कधी असं वाटत असेल ना की ते आपल्याला समजून घेत नाहयेत किंवा चिडचिड होत असेल तर फक्त एका गोष्टीचा विचार करायचा की आपल्याला सुद्धा समजत असूनमाहिती असून सुद्धा काही डिजिटल गोष्टी accept करायला आणि शिकायलासुरुवातीला अवघड गेलंच होतं की.तर मग त्यांना ह्या गोष्टी किती अवघड गेल्या असतीलअजूनही जा असतील..


आणि फक्त तंत्रज्ञानच नाही तर त्यासोबत समाजातकामाच्या ठिकाणीदैनंदिन जगण्यातखाण्यापिण्यात अशा सगळ्याच बाबतीत गेल्या  वर्षा झालेले बदल व्हायला त्यांच्या आधीच्या पिढीला १५-२० वर्ष लागली असती पण ह्यांना तसा पर्यायच मिळाला नाहीहे फार सुपरफास् होतं त्यांच्यासाठी!


ह्या सगळ्या बाबींचा विचार आपण सहसा करत नाही आणि मग त्याचा परिणाम ताणतणाव निर्माण होण्यात होतोआणि ह्यात खरं तरआता २५-४० वयात असणाऱ्या सगळ्यांनीच थोडं धीराने घेऊन आपल्या साठी-सत्तरीतल्या पालकांना समजावून घेतलं पाहिजे.. ते जर एवढे बदल स्वीकारत दोन पावलं चालत असतील तर आपण त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी चार पावलं चालायची तयारी ठेवली पाहिजे!


त्यांना गोष्टी पटकन समजत सतील किंवा तंत्रज्ञान वापरताना अडचणी येत असतील तर चिडचिड करण्याआधी फक्त एवढंच लक्षातठेवायचं पल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यांना हे अवघड जातंय.. आणिआपण लहान मूल असताना आपल्यालापण अशा अनेक अडचणी ल्या तरी त्यांना आपल्याला हिडी-फिडीस करून वाऱ्यावर नाही सोडलंआता संयमाने आणि प्रेमाने वागण्याची आपली वेळ आहे..


आपल्या आई-बाबांसाठी दोन पावलं जास्ती चालू या!

Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

वैचारिक साहित्य - वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडविण्याची ताकद असलेले साहित्य.

ह्या आठवड्यात मी काय वाचू?