Posts

Showing posts from December, 2022

कविता - गोष्ट एका चमत्काराची

Image
 मनाला भावलेल्या एका छोट्याशा संस्कृत कवितेचा मराठीमध्ये भावानुवाद केला आहे .. गोष्ट एका चमत्काराची माझ्या   गरिबीने   मला   खूप   मोठी   जादुई   शक्ती   दिली   आहे , मी   सगळ्या   जगाला   बघू   शकतो पण   मी   कोणालाच   दिसत   नाही ..!!! ————————————————— ... आणि   हेच   वास्तव   तुमच्या   संघर्षाच्या   काळात   पण   अनुभवाला   येतं !  📖

पुस्तककट्टा आणि बरंच काही - Youtube Channel

Image
नमस्कार मंडळी .. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संगीत संध्येचे मी सूत्रसंचालन केले होते , या कार्यक्रमातील “ दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं ” या भजनाची एक छोटीशी झलक , तुम्हा सर्वांसाठी ! (दत्तजयंतीच्या मुहूर्तावर Youtube माझं चॅनेल ऍक्टिव्ह केलं आहे .. नक्की subscribe करा ! धन्यवाद !) ‘ दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं ’ हे भजन ऐकायचं आणि मन तृप्त करायचं ..🙏 या या भजनाची हौस काई पुरी होईना रे होईना .. आनंद पोटात माझ्या माईना रे माईना .. 🙏

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस

Image
काय म्हणू रे भीमा तुला ? दलितांचा कैवारी , रंजल्या गांजल्यांचा उद्धारकरी , अर्थशास्त्राचा ज्ञानी , कायदेपंडित , विद्यावाचस्पती , मूकनायकाचा धनी , संविधानाचा पिता , शोषितांचा रक्षणकर्ता , बुद्धाचा अनुयायी , कबीराचा प्रेमी , आयुष्याचा विद्यार्थी , वाचन - लिखाणाचा गुरु , फुल्यांचा शिष्य , देशाचा शिल्पकार , की सर्वाना पुरून उरणारा मानवतेचा महामेरू .. बा भीमा , तूच खरा शिंपल्यातला मोती ! - शेखर