डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस


काय म्हणू रे भीमा तुला?


दलितांचा कैवारी, रंजल्या गांजल्यांचा उद्धारकरी,

अर्थशास्त्राचा ज्ञानी, कायदेपंडित,

विद्यावाचस्पती, मूकनायकाचा धनी,

संविधानाचा पिता, शोषितांचा रक्षणकर्ता,

बुद्धाचा अनुयायी, कबीराचा प्रेमी,

आयुष्याचा विद्यार्थी, वाचन-लिखाणाचा गुरु,

फुल्यांचा शिष्य, देशाचा शिल्पकार,

की सर्वाना पुरून उरणारा मानवतेचा महामेरू..


बा भीमा, तूच खरा शिंपल्यातला मोती!


- शेखर

Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

वैचारिक साहित्य - वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडविण्याची ताकद असलेले साहित्य.

ह्या आठवड्यात मी काय वाचू?