Posts

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

Image
काही पुस्तकं ही एखाद्या विषयाची सुरुवात म्हणून वाचायची असतात आणि तिथून पूढे तो विषय बाकीच्या पुस्तकातून समजून घ्यायचा असतो. Minimalism: Live a Meaningful Life हे अशाच प्रकारचे पुस्तक आहे. खरं तर तुकोबा चारशे वर्षांपूर्वीच सांगून गेलेत, "चित्ती असो द्यावे समाधान" म्हणजे आपल्याला जितकं मिळवता येईल, घेता येईल त्याच्या मागे न लागता समाधानी वृत्ती ठेवा.. भौतिक गोष्टीत कमी असल्या तरी समाधान मानता आलं पाहिजे. पण सध्या "रॅट रेस" आणि "ऐपतीच्या बाहेरच्या वस्तू घेण्याच्या" सवयीमुळे आपण वस्तूंमध्ये गुंतत चाललो आहोत. आणि गेल्या काही वर्षातल्या " जे जे पाश्चात्य ते ते अनुकरणीय " ह्या संकल्पनेप्रमाणे सगळेच " भौतिक सुखाचा ओला दुष्काळ" (माझी व्याख्या - आवडेल ते, वाटेल ते, दिसेल ते, शेजाऱ्यांकडे/मित्रांकडे/सहकाऱ् याकडे असेल ते आणि रीलवर दाखवतील ते सगळं घेऊन घर भरून जगणं म्हणजे "भौतिक सुखाचा ओला दुष्काळ") अनुभवत आहोत. पण जिथे हे उपजलं त्याच अमेरिकेतले लोक आता ह्या रॅट रेस ला आणि अनावश्यक वस्तू जमवण्याच्या वेड्या हट्टाला धोकादायक समजू लागले आहेत

वाचून आपलं अंतःकरण विशाल झालं पाहिजे!

Image
खूप पुस्तकं वाचून विद्वान झालात पण दयाळूपणा, माणुसकी आणि प्रेम जर शिकला नाहीत तर ती विद्वत्ता ना तुमच्या आयुष्याचं सार्थक करेल ना समाजाचं… वाचून आपलं अंतःकरण विशाल झालं पाहिजे, जाणिवा समृद्ध झाल्या पाहिजेत, माणुसकीची मूल्य हृदयात रुजली पाहिजेत!

प्रेम, काव्य आणि संगीत - ओशो

Image
  आजूबाजूच्या व्यक्तींना समजून घ्यायचे असेल तर प्रेम, काव्य आणि संगीत ह्याशिवाय पर्याय नाही! - ओशो

महाराणी ताराराणी

Image
  संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार केल्यानंतर औरंगजेबाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या, "मराठ्यांचे राज्य आता संपले, संभाजीला मी ठार केला. आणि राजाराम पण जिवंत नाहीये, आता कोण वाचवणार ह्या मराठ्यांच्या गादीला?" पण सह्याद्रीची वीर कन्या, वीर पत्नी आणि शिवरायांची सून वय वर्षे २५ असताना शस्त्रसज्ज होऊन, घोड्यावर मांड टाकून मराठा सैन्याचे नेतृत्व करते, आणि ती पुन्हा मोगलांची दमछाक करते.. आणि तोच औरंगजेब पुन्हा म्हणू लागतो, "मराठा लडकी तेज होती है। सह्याद्रीने कैसे ये आदमी और औरते पैदा किये है |" ह्याच त्या महाराणी ताराराणी.. ज्यांनी जुलमी औरंगजेबाला संताजी- धनाजी मागे लावून चक्रावून आणि छळून औरंगजेबाला ह्याच मऱ्हाटी मातीत गाडून टाकला, कायमचा ! स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा. ( ९ डिसेंबर)

भेद सारे संपू दे!

Image
  जात धर्म रंग भाषा वेशभूषा डावी/उजवी विचारसरणी रहायचे ठिकाण आर्थिक स्थिती शैक्षणिक पात्रता ...भेद सारे संपू दे! माणसाने माणसाशी माणसासम् वागणे!

प्रेम, भक्ती आणि संगीत !

  प्रेम, भक्ती आणि संगीत हे वैश्विक आणि चिरंजीवी आहेत... अनुभवण्यासाठी आपलं मन साफ असलं पाहिजे आणि ओंजळ रिकामी असली पाहिजे इतकेच!

ह्या आठवड्यात मी काय वाचू?

Image
ह्या आठवड्यात मी काय वाचू प्रत्येकजण किमान, “आपल्या कामाच्या संबंधित लेख/पुस्तकाची ३०-४० पाने” नक्कीच वाचू शकतो! असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे ।।